प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी (दि.26) रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. या निमित्त वेगवेगळया शासकिय कार्यालयांसह स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार असून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम होणार आहेत.

अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्याअगोदर जिल्हाधिकारी कार्याल, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा कारागृह, जिल्हा परिषद, पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा अशा अनेक ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये लेझीम, कवायत व देशभक्तीपर वकृत्व स्पर्धा होणार आहेत. तसेच, काही ठिकाणी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम घेतले जाणार आहेत.

Exit mobile version