| उरण | वार्ताहर |
चिटफंड घोटाळा प्रकरणी उरण, पनवेल सह इतर तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांची सतीश गावंड व सुप्रिया पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे. अशा गुंतवणूकदारांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने पैसे मिळवून देण्यासाठी सारडे गावातील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांनी रविवारी ( दि.27) पिरकोण गावात सभेचे आयोजन केले होते.यावेळी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये एकच उद्रेक निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
उरण परिसरात चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हजारोंच्या संख्येने भोळ्याभाबड्या लोकांनी अमाप पैसे हे पिरकोण गावातील सतिश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील या व्यक्तींकडे एंजटच्या मदतीने पैसे गुंतवले आहेत.त्यामध्ये गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली असून सदर प्रकरण हे पोलीस यंत्रणेकडून न्याय प्रविष्ट झाले आहे.त्यामुळे गुंतवणूक दार हे सध्या सैरभैर झाले असल्याने अशा गुंतवणूकदारांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने पैसे मिळवून देण्यासाठी सारडे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे गटातील कार्यकर्ते रुपेश पाटील यांनी गुंतवणूक दारांना आवाहन करुन रविवारी ( दि27) पिरकोण गावात सभेचे आयोजन केले होते.मात्र या सभेत आर्थिक फसवणूक झालेल्या आणि सैरभैर झालेल्या गुंतवणूकदारांचा उद्रेक निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.मात्र अशा फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना शांत करण्यासाठी उरण पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक जगदीश संतोष देवरे, पिरकोण गावातील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गावंड, अनिल पाटील,कुष्णा पाटील हे सातत्याने प्रयत्न करत असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.