| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सीमा सुरक्षा दलाचा जवान पूर्णब कुमार साहू पाकिस्तानातने सोपविल्यानंतर आता भारताने सैनिकाच्या बदल्यात एका पाकिस्तानी रेंजर्सला परत केले आहे. जवान पीके साहूला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले आहे. तो अटारी सीमेवरून परतला आहे.
बीएसएफ जवानांनी चुकून सीमा ओलांडली होती. यानंतर, भारताने पाकिस्तानच्या एका रेंजरला ताब्यात घेतले. पण आता दोन्ही देशांनी जवान आणि रेंजर्सची देवाणघेवाण केली आहे. जवान आणि रेंजरची देवाणघेवाण करण्याची चर्चा सकाळी 10.30 वाजता अटारी येथे झाली. बीएसएफने जवान भारतात परतल्याची माहिती दिली. बीएसएफने एक प्रेस रिलीज जारी करत म्हटले आहे की, आज बीएसएफ जवान पीके साहू परतला आहे. तो 23 एप्रिल 2025 पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होता. सकाळी 10.30 वाजता जॉइंट चेक पोस्ट अटारी मार्गे या जवानाला भारताच्या ताब्यात देण्यात आले. बीएसएफने असेही म्हटले आहे की हस्तांतरण शांततेत आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार पार पडले.
भारताने रेंजरची केली घरवापसी
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अलिकडेच वाढला होता. दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून एकमेकांवर हल्लेही झाले. दहशतवादाविरुद्ध भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. तथापि, युद्धबंदीनंतर,14मे रोजी, बीएसएफ आणि पाक रेंजर्सनी त्यांच्या भागातून पकडलेल्या सैनिकांना शांततेत परत केले आहेत. फिरोजपूरमधील पाकिस्तान सीमेवरून पाक रेंजर्सनी भारतीय सैनिकाला अटक केली. दुसरीकडे, बीएसएफने राजस्थानमधील भारतीय सीमेजवळ एका पाकिस्तानी रेंजरला पकडले होते. बीएसएफ जवानाच्या बदल्यात भारताने पाक रेंजरही पाकिस्तानला सोपवला आहे.