| पनवेल | प्रतिनिधी |
दुर्पता तारासिंह साउद ऊर्फ छोटी हिने बंगळूरू येथे पार पडलेल्या 69 राष्ट्रीय बॉक्सिंग शालेय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण पदक मिळवून महाराष्ट्र आणि पनवेल चा मान वाढवला. तिने सुरवातीच्या लढतीमध्ये तेलंगाना आणि केरळ चा बॉक्सर ना पाहिल्याचं फेरीत हरवून क्वार्टर फाइनल मध्ये हरियाणा ची बलाढ्य खेळाडू किरण हिला
एकतर्फी हरवून सेमी फायनल मध्ये कर्नाटक ला हरवून अंतिम फेरी मध्ये झारखंडच्या पूर्व राष्ट्रीय विजेतीवर तूफान आक्रमक खेळी खेळून पराभूत केलं आणि राष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने मिळवलेला हा विजय खरच कौतुकास्पद आहे. दुर्पता ही के वी कन्या शाळेची अकरावी कला शाखेची विद्यार्थिनी आहे. तिचे प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यानी आनंद व्यक्त केला असून दुर्पताला नंतर उच्चतम प्रशिक्षक भारताचे माजी ऑलिंपियन अर्जुन पुरस्कार प्राप्त मनोज पिंगळे व सातारा निवासी अंतरराष्ट्रीय कोच सागर जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. को.ए.सो. केशवजी वीरजी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पनवेलचे शाळा समिती सभापती माजी आ. बाळाराम पाटील, सर्व शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका, राधिका ठाकूर व सर्व शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक
