राज्यस्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेत पारस पाटीलचा तृतीय क्रमांक

| पोयनाड | वार्ताहर |
शिवसृष्टी पुणे संघटनेकडुन किल्ला शिवरायांचा किल्ले बांधणी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये चौथा खुला गटात पारस पाटील चौकिचापाडा याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेसाठी पारस पाटीलने मुरूडजवळील समुद्रात असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आपल्या घरासमोर दिवाळीत उभारली होती. पद्मदुर्ग किल्याची प्रतिकृती आकर्षक व सुंदर होती. पारसने त्याच्या आवाजात पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास शब्दांकन केला होता. किल्ला पाहताना वा किल्ल्याची माहिती ऐकताना खरोखर पद्मदुर्ग किल्ला पाहत आहे असेच वाटते.पारसला किल्ले बांधणीसाठी स्वरा, आर्यन, ओवी, निशांत या चिमुकल्यांनी मदत केली.

पारस पोयनाड हायस्कूलमध्ये बारावी सायन्सचे शिक्षण घेतो. गतवर्षी दुर्गरक्षक सामाजिक संस्था अलिबाग संस्थेच्या किल्ले बांधणी स्पर्धेत सागरगड किल्ल्याची प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला. राज्यस्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेत पारसने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version