| चणेरा | वार्ताहर |
रोहा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या बैठक बुधवार (दि.1) सप्टेबर रोजी पार पडली. तालुक्यातील काही भागात होऊ घातलेल्या ग्राम पंचायतीमधील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर होत असलेले आंदोलन, उपोषण, व रास्तारोको पाहता या सर्व घडामोडींचा उद्रेक होऊ नये. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सर्व धर्म प्रतिनिधी, तंटामुक्त अध्यक्षांची एकत्रित बैठक घेण्यात आली.
तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार व तहसीलदार किशोर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा पोलिस्टेशनच्या दालनात घेण्यात आलेल्या बैठकीत सोशल माध्यमातून चिथावणी होऊ नये, तसेच ग्रामीण भागातील निवडूका देखील खेळीमेळीच्या वातावरणात पार पडाव्यात या उद्देशाने या सभेचे आयोजन केले असल्याचे रोहा पो.नि.प्रमोद बाबर यांनी सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, लालताशेट कुशवाहा, उस्मानशेट रोहेकर, महेश पा.रोकडे, रविंद्र चालके, बिलाल मोरबेकर, एम.पी.पानसरे, फारुक अ.रहिम सवाल, नझीर कादीर खान, अमित कांबळे, रघुनाथ कडू व शातता कमिटी सदस्य तसेच पत्रकार मंडळाच्या उपस्थित होते.