ट्रेलरखाली सापडून पादचारी ठार

। पनवेल । वार्ताहर ।
भरधाव वेगाने घेऊन जात असलेल्या ट्रेलर चालकाचा ताबा सुटून ट्रेलर पलटी होत असताना त्याखाली एक पादचारी सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे घडली आहे. पळस्पे फाटा येथील गोवा-मुंबई महामार्गावर ट्रेलर जात असताना चालकाचा ट्रेलरवरील ताबा सुटून तो पलटी होत असताना पादचारी श्रीमंत हसनअप्पा कांबळे (60) हे त्याखाली सापडून त्यात त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version