| पेण | प्रतिनिधी |
शिवसेनेशी गद्दारी करून आपल्यासह इतरआमदारांना आसाम गुवाहाटी येथे पळून घेऊन जाणार्या एकनाथ शिंदेंचा पेण तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीर निषेध करून त्याचा बॅनर फाडला. तर पेणच्या विक्रम चालकांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोचा बॅनर हटविला.
शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रायगडातील आमदार महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे आ.भरत गोगावले व एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला. या बैठकीला जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, माजी उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, महानंदा तांडेल, प्रेषिता ठाकूर, राजश्री पाटील, तालुकाप्रमुख तुषार मानकावळे, मा. तालुका शहर प्रमुख प्रदीप वर्तक, तालुका संपर्क प्रमुख राजाराम पाटील, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, जयराज तांडेल, राजू पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, नरेश शिंदे, गजानन मोकल, युवासेनेचे चेतन मोकल, प्रसाद देशमुख, अच्युत पाटील, प्रमोद घरत, नरेश सोनवणे, नंदू मोकल, रवींद्र पाटील, कीर्तिकुमार कळस, दीपक पाटील, अरुण भोईर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण, वाहतूक सेनचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या ताकदीवर निवडून येणार्या रायगडातील तिनही आमदारांना आगामी निवडणुकीमध्ये पराभवाचे पाणी पाजू तसेच पक्षाशी गद्दारी करणार्यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन किशोर जैन यांनी यावेळी केले. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पेण शहरात निषेध मोर्चा काढून गद्दारांचा निषेध केला. नीम का पत्ता कडवा है एकनाथ शिंदे भडवा है ! शिवसेना अंगार है. एकनाथ शिंदे भंगार है ! उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! या घोषणा देऊन आपला संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला.
शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे समर्थक अंजली जोगळेकर यांच्या कार्यालयावर धडक दिली या कार्यालयाला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा प्रदान केली होती संतप्त शिवसैनिकांनी या कार्यालयावर लावलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर काळे फासण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यावर गनिमी कावा करीत कासू विभाग प्रमुख गजानन मोकल यांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर काळे फासण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.