डीन लीडरशिप पुरस्काराने सन्मान
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील ओंकार पाटील या तरुणाने अमेरिकेत शिक्षणाच्या जोरावर नाव लौकिक केले आहे. त्याला सेक्रेट हार्ड युनिव्हर्सिटी अमेरिका येथे डीन लीडरशिप अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील स्वप्नाली पाटील यांचा मुलगा ओंकार पाटील याचे बारावीपर्यंतचे शिक्षण येथील को.ए.सो नाना पाटील हायस्कूल मध्ये झाले आहे. त्यानंतर मुंबई चेतना कॉलेज बांद्रा येथे पदवी प्राप्त केली. ओंकारला उच्च शिक्षणाची आवड असल्याने त्याने परदेशात लंडन येथे एमबीए पदवी प्रथम श्रेणी संपादन केली. त्याला फायनान्स क्षेत्राची आवड असल्याने अमेरिका येथे सिक्रेड हार्ड युनिव्हर्सिटी येथे प्रवेश मिळविला. 7 मे रोजी झालेल्या पदवीदान समारंभात 2024-25 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये ओंकारच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन सिक्रेट हार्ड युनिव्हर्सिटीने त्याला डीन लिटर शिप अवॉर्डने सन्मानित केले आहे. प्रचंड मेहनत, शिकण्याची आवड, जिद्दीच्या जोरावर तसेच आई वडीलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे ओंकार पाटील याने पेझारीसह अलिबाग तालुका व जिल्ह्याचे नाव लौकीक केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.