| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील छत्रीनिजामपूर आदिवासी वाडी येथील एक धक्कादायक घटना घडली असून, अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण काटकर (40) याने पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील तिची इच्छा नसताना तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामध्ये पीडित मुलगी ही गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या विरोधात पोक्सो व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड तालुका पोलीस उपनिरीक्षक कुशल खेडेकर करीत आहेत.