शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात दि. 19 ते 23 फेब्रुवारीदरम्यान पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार अलिबागकरांसह जिल्हाभरातील क्रीडारसिकांना पाहावयास मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दिवस-रात्र खेळविण्यात येणार्या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामासाठी आतापर्यंत सातशेहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली असून, त्यांचा लिलाव उद्या बुधवारी (दि. 5) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये होणार आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्ह्यातील 24 संघ या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित अलिबाग, मुरूड व रोहा तालुका मर्यादित दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.19 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत क्रिकेटचा थरार कुरूळ येथील भव्य क्रीडांगण आझाद मैदानावर पाहावयास मिळणार आहे. जिल्ह्यातील 24 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यानिमित्ताने बुधवारी कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. हा सोहळा शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, सुप्रिया पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अॅड. मानसी म्हात्रे, स्पर्धेचे आयोजक नृपाल पाटील, पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील व इतर मान्यवर तसेच सर्व संघांचे संघमालक आणि कर्णधार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.