| मुंबई | प्रतिनिधी |
सर्व मुंबईकरांचे लक्ष लागलेला मुंबई महापालिकेचा 2025-206 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंगळवारी (दि. 4) आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला. 2025-26 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पामध्ये 74 हजार 427.41 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या 59 हजार कोटींवरुन 74 हजार कोटींवर आलं आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असून 14.19 टक्के वाढ झालेली आहे. यामध्ये मुंबईकरासांठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी 7 हजार कोटींची तरतूद , तर शिक्षण सुविधांसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट काय मिळणार याकडेही अनेकांचं लक्ष लागलं होतं. तर बेस्ट उपक्रमासाठी 1000 कोटींची तरतूद अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.