। रसायनी । वार्ताहर ।
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चौक बाजार पेठेतमन खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला. येणारे सणवार, प्रजासत्ताक दिन याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून भयमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला.
राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धींगत व्हावा यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन पवार, सपोनि. विशाल पवार, सपोनि. मनिष मोरे, संतोष औटी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, राखीव दल, दंगल नियंत्रण या दलांच्या माध्यमातुन चौक शहरातून रुट मार्च काढण्यात आला. दोन दिवसापासून चौक ग्राम पंचायत यांनी स्वच्छ्ता अभियान सूरू करून अनधिकृत बांधकाम हटविण्याची मोहीम घेतली आहे. तसेच, सारंग येथील शेतकर्यांनी कंपनी विरोधात खालापूर तहसिल कार्यालय समोर आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रूट मार्च काढण्यात आला का? अशी चर्चा सुरू होती.