। उरण । वार्ताहर ।
उरण येथील मोरा जेट्टीच्या शौचालयाची ही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मात्र त्याकडे मेरी टाईम बोर्डचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मेरीटाईम बोर्डने या समस्यानकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी विशेष करुन महिला वर्ग करीत आहे. भाऊचा धक्का (मुंबई )व घारापुरी बेटावर जाण्यासाठी मोरा जेटीचा वापर सर्रास प्रवाशी नागरीक करत आहेत. येणार्या जाणार्या प्रवाशांसाठी मोरा जेटीवर मेरिटाइम बोर्ड मार्फत ज्या सुख सोयी असायला हव्या आहेत. त्या दिल्या जात नाहीत. विशेष म्हणजे मुख्य गोष्ट शौचालय चांगल्या प्रकारे असायला आहे. परंतु मोरा जेटीवर असे काहीच दिसत नाही. जेटीवर शौचालयाची दुरवस्था झाली असून दरवाजे ही मोडक्या अवस्थेत आहेत.
यामुळे विशेष म्हणजे महिला वर्गाला याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी महिला वर्ग करीत आहेत. सफाई कामगार नाही त्यामुळे साफ सफाई ची कामे होत नाहीत पाण्याची सोय नाही ,लाईट ची सोय नाही शौचालायास दरवाजेही नाहीत फारच दुरवस्था झाली आहे मोरा ते मुबई या जल प्रवासास एकेरी भाडे ( तिकीट ) 80 रुपये आहे व दि.26 मे पासून ते भाडे 105 रुपये होणार आहे दर रोज मुंबई येथे जाण्यासाठी शेकडो पावसी प्रवास करीत आहेत उत्पनांचे चांगले साधन असून सुद्धा प्रवाशाच्या सुख सोयी कडे दुर्लक्ष केले जात आहे