। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे हिंदुत्व हे बेसलेस आहे अशी खरमरीत टीका मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. बेणसे येथे किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर आपली भूमिका परखडपणे स्पष्ट केली. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की बेणसे येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान प्रसंगी त्या बोलत होत्या. राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू झालेले आहे. या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळतोय. खा.राजन विचारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराने हे अभियान सुरू झालेले आहे.
उद्धव ठाकरे सांगितले आहे की आपण सत्तेत असताना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे, त्यांच्यापर्यंत ज्या योजना शासनाने आखल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. विरोधी पक्षाने आमच्या विरोधात कोंडी अथवा काही करो पण आम्ही महविकास आघाडी च्या माध्यमातून जनतेच्या विकासाची कामे करीत राहणार. विरोधी पक्षाने आमच्या विरोधात चालवलेले राजकारण हे अत्यंत हिन आणि खालच्या दर्जाचे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे त्यामुळे लवकरच त्याच्यावर पडदा पडेल. असे महापौर पेडणेकर म्हणाल्या. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जे आदेश देतील त्यानुसारच काम करणार आहोत. असे सांगून आघाडी व युती बाबत किशोरी पेडणेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.