रस्त्यावरील खड्डे, खडीमुळे अपघाताला निमंत्रण
| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे ग्रहण केव्हा संपणार, असा प्रश्न तालुक्यातील जोडणार्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे पाहून विचारला जात आहे. रस्त्यावर खड्डा तसेच खडीमुळे वहान घसरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मात्र, या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यामुळे पौध-निगडोली या रस्त्यांची अक्षरशः चाळण होत असल्याचे दृश्य या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
पावसाळ्यात या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे तलावाचे स्वरुप प्राप्त होत असते. परिणामी, हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या मार्गावरुन शाळकरी मुले, वयोवृद्ध प्रवास करीत आहेत. मात्र, गेले अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष करीत होत असल्यामुळे हाच रस्ता प्रवासीवर्गाची डोकेदुखी ठरत आहे. हा रस्ता दर्जेदार केव्हा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.