वरसे हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था

। रोहा । प्रतिनिधी ।
वरसे ग्राप हद्दीतील निरलॉन कॉलनी ते पंचायत समिती तसेच कालवा रोड या दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. रोहा शहरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या या मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रवास करणे कायम डोकेदुखी ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आणि पंचायत समिती बांधकाम विभागात येणार्‍या निरलॉन ते पंचायत समिती पर्यंतचा रस्ता या मार्गाने रोहा शहराकडे जावे लागते .तसेच कालवा रोड आणि निरलॉन कॉलनीकडचा रस्ता लगतच्या दोन्ही बाजूच्या पाटबंधारे विभागाच्या भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या उभा केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्या रस्त्याने प्रवास करणार्‍या प्रवासी वर्गाला प्रचंड त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे. तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांनी जलसंपदा विभागाची साकव पुलाची पूर्वपरवानगी घेतली नसून शासकीय जागांवर व्यावसायिकानी अतिक्रमण करून जागा हडप केल्या असून भविष्यात या बांधकामावर हातोडा पडणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न सागण्याच्या अटीवर सांगितले. नागरिकांनी वरसे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे पासुन स्वतःच्या मालकी फ्लॅट खरेदी करताना कुठे फसवणुक होते का हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे.असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Exit mobile version