प्रशांत मिसाळ यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील बेकायदेशीर जमीन व्यवहारप्रकरणी सात जणांविरोधात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुन्हा दाखल केला होता. यातील उध्दव ठाकरे गटातील प्रशांत मिसाळ यांचा अटकपुर्व जामीन फेटाळल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी त्यांना मुरुड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उध्दव ठाकरे गटातील प्रशांत मिसाळ यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी साळाव चेकपोस्टजवळ प्रशांत मिसाळ यांना अटक केली. त्यांना मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर मंगळवारी (दि.11) दुपारी मुरुड येथील न्यायालयात त्यांना हजर केले.

न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची (दि.13 एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ करीत आहेत.

Exit mobile version