• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

रोगराईला आळा पर्यावरण संवर्धनास मदत

Krushival by Krushival
September 19, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
रोगराईला आळा पर्यावरण संवर्धनास मदत
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

आपल्याला माणसांसाठी असणारे रेस्टॉरंट माहिती आहे. मात्र, गिधाडांसाठी रेस्टॉरंट कधी ऐकले आहे का? हो! रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यात चक्क गिधाडांसाठी एक रेस्टॉरंट आहे.

ग्रीन वर्कस् ट्रस्ट ही बिगर शासकीय संस्था मागील काही वर्षे फणसाड वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन व जनजागृती या विषयांवर कार्यरत आहे. फणसाड अभयारण्यात वनखात्याच्या माध्यमातुन व्हल्चर रेस्टॉरंट (गिधाड आहार केंद्र) हे गिधाडांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण उभारले आहे. साल 2014 मध्ये याठिकाणी 20-25 गिधाडे पाहण्यात आली होती. मात्र, त्यांनतर या ठिकाणी गिधाडे पाहण्यात आली नाहीत. त्यामुळे या गिधाड रेस्टॉरंटचा मुख्य उद्देश, गिधाडांना या ठिकाणी आकृष्ट करणे हा आहे. यामुळे फणसाड अभयारण्यात गिधाडांचे पुनरुज्जीवन व संवर्धन होऊन त्यांच्यावर संशोधन देखील होईल.

सदर गिधाड रेस्टॉरंटचे कामकाज आणि त्याबाबत जनजागृती करण्याचे काम हे ग्रीन वर्कस् ट्रस्ट आणि एस.बी.आय. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाले आहे. या कार्यास महाराष्ट्र वनविभाग (ठाणे, वन्यजीव) यांचे मोलाचे सहकार्य व सहाय्य त्यांना लाभत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गिधाड हा पक्षी ‘अनुसूची एक’मध्ये समाविष्ट आहे. तरीही, सद्यःस्थितीत गिधाडांची संख्या अतिशय कमी झालेली दिसते. तरी, त्यांच्या संवर्धनासाठी त्यांना नियमित अन्नपुरवठा मिळावा या हेतूने गिधाड आहार केंद्रात जनावरांचे मृतदेह पुरवण्याचे काम या प्रकल्पात हाती घेतले आहे.

गिधाड हे निसर्गातील सफाई कामगार आहेत. मृत जनावरे हे त्यांचे मुख्य खाद्य असल्याने अशा प्रकारचे मृत जनावर ते 10 ते 15 मिनिटात खाऊन फस्त करतात. एखादे जनावर मृत झाल्याचे ग्रीन वर्कस् ट्रस्ट या संस्थेस कळवल्यास ते जनावराचा मृतदेह घेऊन व्हल्चर रेस्टॉरंटपर्यंत मोफत पोहोचवतात. अशाने घटनास्थळी असलेल्या नागरिकांची गैरसोय टाळता येईल व जनावर हे गावानजिक न पुरल्यामुळे रोगराई आळा बसेल.

डॉ. सचिन देशपांडे,
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड
पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य
सदर प्रकल्पास रायगड पशुसंवर्धन विभाग सहकार्य करत आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना वा पशुचिकित्सालय यांच्या मार्फत जिल्ह्यातील मृत जनावरांची माहिती तात्काळ सदर संस्थेस देण्यात येत आहे.
मृत जनावरांची मोफत वाहतूक
आपल्या आजूबाजूला एखाद्या जनावराचा (गाय, बैल, म्हैस, घोडा, गाढव) मृत्यू झाल्यास कृपया ग्रीन वर्कस् ट्रस्टला 9096297059 व 8779409460 या क्रमांकांवर संपर्क साधावा. जनवारांस विषबाधा किंवा जनावरचा मृत्यू प्लॅस्टिक खाऊन झालेला नाही याची मात्र दक्षता घेणे आवश्यक आहे. सदर मृत जनावरांची वाहतूक संपूर्णपणे मोफत आहे. आपल्या परिसरातील या स्वच्छतेच्या कामाला तसेच पर्यावरण संवर्धनाच्या कामाला वेळोवेळी आपल्याकडून सहकार्य लाभावे असे आवाहन ग्रीन वर्कस् ट्रस्टचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. निखिल भोपळे यांनी केले आहे.
या प्रकल्पाचा इतिहास
डिसेंबर 2021 मध्ये या प्रकल्पाचा पथदर्शी प्रकल्प सुरु झाला. टीमद्वारे जनावरांचे मृतदेह गिधाड आहार केंद्रात पुरवले गेले आणि 11 महिन्यांनंतर आशेचा किरण दिसला. 2022 च्या नोव्हेंबर महिन्यात गिधाड संवर्धन केंद्रात इजिप्शियन गिधाड दिसले. परिणामी, नव्या जोमाने गिधाड संवर्धन प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेचे आयोजन
रायगड पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य यांची पशुगणनेसंदर्भातील कार्यशाळा पनवेल येथे संपन्न झाली. यामध्ये ग्रीन वर्कस् ट्रस्टने उपस्थितांना प्रकल्पासंदर्भात माहिती दिली व त्यांना मदतीचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, सहाय्यक आयुक्त खालापूर डॉ. रत्नाकर काळे, सहाय्यक आयुक्त अलिबाग डॉ. अजय कांबळे, ग्रीन वर्कस् ट्रस्टचे डॉ. निखिल भोपळे आणि जिल्ह्यातील सर्व सहायक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

Related

Tags: Environmental ConservationGreen Works Trust is a non-governmental organizationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNature environment conservation and public awareness in wildlife sanctuariesnewsnews indiaonline marathi newspali/ gomashi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उरण-करंजा रस्ता मृत्यूचा सापळा

Next Post

डाक अदालतीचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
sliderhome

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

March 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

डाक अदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?