आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राचा अखेर शुभारंभ

| आंबेत | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील आंबेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुमारे पाच कोटी खर्च करून बांधण्यात आलेली इमारत गेल्या वर्षभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. अखेर खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 10 वाजता अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

सुसज्ज आणि देखणी अशी इमारत रायगड जिल्ह्यात आकर्षित असून, अनेक रुग्णसेवा आणि उपचार पद्धती या दवाखान्यात उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी दाजी विचारे, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी कृषी सभापती बबन मनवे, आरोग्य अधिकारी विखे मॅडम, सोनल घोले, सरपंच अफरोजा डावरे, उपसरपंच, ऋतुजा सावंत, तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड, बीडीओ, गिरीश काळे, पाणी पुरवठा अधिकारी फुलपगारे यांसह अनेक कार्यकर्ते, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version