। उरण । प्रतिनिधी ।
उरण विधानसभा मतदार संघात करोडो रुपयांची कामे केल्याचा दावा करणारे आ. महेश बालदी आणि मा.आ. मनोहर भोईर हे फक्त विकासाच्या गप्पा करत असून, विकास कामे करण्यात दोघेही कमी पडल्याची भावना उरणकरांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रीतम म्हात्रे यांचे पारडे जड असल्याची चर्चा उरण मतदार संघात होत आहे.
विधानसभा निवडणुकीत एकदा निवडून दिलेला उमेदवाराला उरणकर पुन्हा संधी देत नसल्याचा इतिहास आहे. भाजप महायुती तर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले आ. बालदी यांची निवडणूक रिंगणात उतरण्याची ही दुसरी वेळ आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाकडून मा.आ. भोईर यांना दुसर्यांदा संधी देण्यात आली आहे. तसेच, शेकाप तर्फे निवडणूक लढवत असलेले प्रीतम म्हात्रे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत असून त्यांना एकदा संधी देऊन पाहण्याच्या विचारात उरण मधील मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. यामुळे प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचाराला स्थानिक उरणकर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.