| पाली । वार्ताहर ।
को.ए.सो.डॉ.प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा शाळेचे चेअरमन अॅड. प्रविण कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा फुटबॉल असो.सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष प्रशांत तांबे, डॉ.दर्शन आवास्कर, गणपत मोहिते, विजय शिरसाळे, संतोष गायकवाड, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री. तांबे यांनी विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबतच खेळ, नृत्य, गायन यांना महत्व असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेअरमन व वंदना शिरसाळे तसेच सेवक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.