। अलिबाग । वार्ताहर ।
नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ नवीन पनवेल तर्फे (दि.8) मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मंडळातर्फे निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. निबंध स्पर्धेचा विषय ‘आजच्या काळात महिलांचे समाजातील मानाचे स्थान’ हा होता. नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळातर्फे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निबंधस्पर्धेतील विजेतांचे बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला.
यावेळी प्रथम क्रमांक भारती राजेंद्र पोतदार (नवीन पनवेल), व्दितीय क्रमांक शारदा भास्कर भामरे, (नवी मुंबई), तृतीय क्रमांक संगीता धनराज विसपुते, (नवीन पनवेल) आणि उत्तेजनार्थ डॉ. दिपाली सतिश विसपुते(नवीन पनवेल) या निबंधस्पर्धेतील विजेतांना पुरस्कार व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे, महिला मंडळ अध्यक्षा संगीता धनराज विसपुते, अॅड. शाम विसपुते, भास्कर भामरे, श्रीनिवास पोतदार, पांडुरंग सोनार, भास्कर बापुराव भामरे, शारदा भास्कर भामरे, मिलिंद खरोटे आदी उपस्थित होते.
