| रसायनी | वार्ताहर |
आपली जमीन देऊन साठ वर्षांपेक्षा अधिक काळ होऊनही प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. आजही त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने असंतोषाचे वातावरण आहे. सन 2018 मध्ये एचओसी गेटसमोर 19 दिवस बेमुदत केलेल्या आंदोलनातील मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी 21 जानेवारीपासून बीपीसीएल गेटजवळ बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्याप्रमाणे दि. 21 जानेवारीपासून बीपीसीएल गेटवर बेमुदत उपोषण करण्याचे ठरले असून, तसे निवेदन बीपीसीएल/एचओसीएल कंपनी, राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, महसूलमंत्री, प्रधान सचिव, पोलीस अधीक्षक, संबंधित शासकीय अधिकारी यांना देण्यात आले असून, आम्हा प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास बीपीसीएल कंपनीतील सर्व कामे बंद करु, असा इशारा शेतकरी प्रकल्पग्रस्त संघटनेचे पदाधिकारी रमेश पाटील यांनी दिला आहे.