लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट

। पनवेल । वार्ताहर ।

खांदेश्‍वर पोलीस ठाणेकडील मागील पाच वर्षांच्या कालावधीतील विविध दाखल पुण्यातील 58 दारूचे बॉटल कॅन, गुटखा सिगारेट असा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाने नेवाळी येथे नष्ट करण्यात आला.

खांदेश्‍वर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमधील 65 ई-कलमान्वये दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या होत्या. संबंधित विभागाच्या आदेशाने गुटख्याचे पाच गुन्हे व दारूचे चाळीस गुन्हे अशा एकंदरीत साडेपाच लाखाची दारू आणि साडेपंधरा लाखाचा गुटखा मोठ्या प्रमाणात असल्याने मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत होती. तसेच, या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाण्यात दीर्घ कालावधीपासून पडून राहीला होता. ईएमसी या संकल्पनेच्या माध्यमातून हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

Exit mobile version