घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

नवीन पनवेल येथील घराचा दरवाजाचा तोडून लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंदा पेरूमल हे नवीन पनवेल सेक्टर 14 येथे राहतात. ते घरी परतले तेव्हा त्यांना त्यांच्या घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी पाहणी केली असता घरातील पैसे आणि सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. चोरट्याने त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

Exit mobile version