| पनवेल | प्रतिनिधी |
ऐन दीपावली सणामध्ये कामोठेतील एका सोसायटीच्या टॉवरमध्ये पहाटे भीषण आग लागून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर कामोठे फोरमतर्फे परिसरातील प्रत्येक सोसायटीमध्ये फायर सेफ्टीबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. आग लागल्यास तात्काळ फायर पंप कसा सुरु करावा, तसेच आग विझविण्याची प्रक्रिया कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी संदीप इथापे यांनी दाखवून दिले. यावेळी उपस्थित नागरिकांना आगीच्या प्रसंगी तात्काळ कोणती पावले उचलावीत, फायर सिस्टम कार्यरत ठेवण्याचे महत्त्व आणि सुरक्षाविषयक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.







