22 वर्षे टेनिसमध्ये कारकिर्द; वयाच्या 45 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा टेनिस स्टार रोहन बोपण्णाने निवृत्तीची घोषणा केली आहे. जवळपास 22 वर्षे टेनिसमध्ये कारकिर्द घडवल्यानंतर बोपण्णाने वयाच्या 45 व्या वर्षी सोशल मीडियावर पोस्ट करत तो निवृत्ती घेत असल्याचे शनिवारी (दि.1) जाहीर केले. त्याने ‘गुडबाय… पण हा शेवट नाही.’ असे म्हणत त्याचा हा निर्णय सर्वांना सांगितला.
बोपण्णाने त्याचा अखेरचा सामना या आठवड्याच्या सुरुवातीलाच पॅरिस मास्टर्स स्पर्धेत खेळला. त्यात तो कझाकस्तानच्या ऍलेक्झँडर बब्लिकसोबत दुहेरीत खेळला होता. परंतु, त्यांची जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाली. त्यानंतर आता भारताचा ग्रँड स्लॅम चॅम्पियन असलेल्या बोपण्णाने त्याच्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये भावनिक संदेश लिहिला आहे.
बोपण्णाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, तुमच्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टीचा निरोप कसा घ्यायचा असतो. अविस्मरणीय 20 वर्षांच्या प्रवासानंतर आता वेळ आली आहे. मी माझं रॅकेट अधिकृतरित्या लटकवत आहे. मी हे लिहित असताना माझे अंतःकरण जड झाले असून कृतज्ञतेने भरलेले आहे. भारतातल्या कुर्ग या छोट्या गवातून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. लाकडाचे ओंडके कापताना माझे सर्व्ह मजबूत झाले आणि कॉफीच्या मळ्यातून धावताना स्टॅमिना मळािला. तुटलेल्या कोर्ट्सवर स्वप्न पाहाता पाहाता, जगातील मोठ्या मंचापर्यंत पोहचलो, हे सर्व एका स्वप्नाप्रमाणे भासत आहे.
बोपण्णाने पुढे लिहिले की, टेनिस फक्त माझ्यासाठी खेळ नाही, तर त्याने मी जेव्हा हरलो, तेव्हा मला एक उद्देश दिला, जेव्हा मी तुटलो, तेव्हा ताकद दिली आणि जेव्हा जगाने माझ्यावर शंका घेतली, तेव्हा विश्वास दिला. प्रत्येकवेळी जेव्हा मी कोर्टवर उतरलो, तेव्हा मला त्याने चिकाटी शिकवली, पुन्हा उभे राहायला शिकवले, लढायला शिकलवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी का सुरुवात केली आणि मी कोण आहे, याची आठवण नेहमीच करून दिली. रोहन बोपण्णाच्या या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याला अनेकांनी त्याच्या कारकिर्दीचे अभिनंदन करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बोपण्णाने ग्रँडस्लॅमशिवाय दुहेरीत 26 एटीपी स्पर्धही जिंकल्या. ज्यात त्याने 44 व्या वर्षी जिंकलेल्या मियामी ओपन 2024 स्पर्धेचा समावेश आहे. याशिवाय बोपण्णा 2002 ते 2023 दरम्यान भारताच्या डेव्हिस कप संघाचा भाग राहिला आहे.
ग्रँड स्लॅम जिंकणारा वयस्क टेनिसपटू
बोपण्णाने वयाच्या 43 व्या वर्षी इतिहास घडवला होता. त्याने मॅथ्यू एब्डेनसह दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन 2024 ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. तो दुबेरीत ग्रँड स्लॅम किताब नावावर करणारा, तसेच दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मळिवणाराही सर्वात वयस्क टेनिसपटू ठरला होता. बोपण्णाने 2017 मध्ये फ्रेंच ओपन हा ग्रँड स्लॅम किताबही मिश्र दुहेरी मळिवला होता. तो ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या भारताच्या चार खेळाडूंपैकी एक आहे. यापूर्वी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या भारतीय टेनिसपटूंनी ग्रँड स्लॅम जिंकली आहे.





