। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील साळाव परीसरात गेल्या दहा पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, येथील बिबट्याच्या हल्ल्यात कृष्णा पाटील यांच्या वाड्यातील म्हशीच्या दोन रेडकांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीमार्फत वनविभागाला करण्यात आली होती. याची रोहा वनविभागाचे उपवनसंरक्षक निकत व मुरुड वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांनी तातडीने दखल घेऊन साळाव परिसरात जनजागृती करण्यात आली आली.
दहा-पंधरा दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या वन्यप्राण्यांपासून खबरदारी व संरक्षण कसे करावे. याबाबतीत रोहा वनविभागाचे उपवनसंरक्षक निकत यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे तसेच वनपाल वैभव शिंदे (बोर्ली), वनरक्षक पंढरिनाथ दिघे, भगवान पिंगळे, पृथ्वीराज चव्हाण, एन.जी.ओ. कृणाल साळुंखे यांनी साळाव व परीसरातील गावात जाऊन लोकांना मार्गदर्शनपर माहिती देऊन बिबट्या व वन्यप्राण्यांपासून खबरदारी व संरक्षण कसे करावे, याबाबतीत सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली.