अमली पदार्थ सेवन विरोधी विद्यार्थ्यांची जनजागृती

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

अमली पदार्थ शरीरासाठी घातक आहे. तरी सुद्धा तरुण वर्ग यांचे सेवन करीत असतात. मात्र शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या लहान मुलांच्या वरती हे पदार्थ शरिरास घातक असून, त्यांचे दुष्परिणाम खूप भयंकर आहे. यांची एकदा यांची सवय लागली ते सुटणे जवळ-जवळ अशक्य होत असते. यामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी मुख्याध्यापक सुभाष राठोड शिक्षक, विद्यार्थी यांनी जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी या परिसरातील ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहावयास मिळले.

यावेळी विद्यार्थ्यांनी हातात अमली पदार्थांच्या नावांचे फलक घेवून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. यावेळी तंबाखू, गुटखा, विडी, सिगार, दारु, ड्रग्स असे मानवी शरीरास घातक ठरत असलेल्या सर्वच नशेली पदार्थ सेवन करु नये असे प्रबोधन विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये केले. यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर पोस्टर रंगवणे यामध्ये सर्वच विद्यार्थानी सहभाग नोंदविला असल्याचे पाहावयास मिळाले. स्पर्धेत उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात, बक्षिसे व वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा करुणा ठोंबरे, उपाध्यक्षा राजश्री जांभुळकर, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन वैजनाथ जाधव यांनी केले तर प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विषय शिक्षिका सरस्वती कवाद, स्वयंसेविका साक्षी, निकिता, भाग्यश्री, अकांक्षा व माजी विद्यार्थी ऋषिकेश जाधव, श्रुतिका जांभुळकर यांनी सहकार्य केले.

Exit mobile version