कर्जतमध्ये उद्या शेकापची जाहीर सभा

शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांची उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील संबोधित करणार आहेत. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका चिटणीस राम राणे यांनी केले आहे.

या जाहीर सभेत माजी आ. पंडित पाटील मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या बाबत पक्षाची असलेली भूमिका, बदलते राजकारण अशा अनेक विषयांवर पंडित पाटील या बोलणार याकडे कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version