| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि माजी आमदार सुरेश लाड यांचे मेव्हणे पुंडलिक वाळकु मते पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुंडलिक मते यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत पंचायत समितीच्या माजी सदस्य उर्मिला तथा नानी पुंडलिक पाटील यांचे पती होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन कन्या तसेच बहीण, नातवंडे असा मोठा परिवार आहे.