वन्यजीवांची तहान भागवा

| पनवेल | वार्ताहर |

वाढत्या उष्णतेमुळे कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्यजीव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र सचिव गणेश थोरवे यांनी केली आहे. याबाबत थोरवे यांनी कर्नाळा अभयारण्याचे वनविभाग अधिकारी नारायण राठोड यांना पत्रही दिले आहे. याप्रसंगी रायगड जिल्हा अध्यक्ष सागर कुरंगले, रायगड जिल्हा सचिव महेंद्र मोकल व रायगड जिल्हा सहसचिव सचिन मोरे, वन रक्षक भुपेंद्र वारगे, अरुण वेळे यांच्यासह वनकर्मचारी देखील उपस्थित होते.

वन्यजीवांना पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागू नये या अनुषंगाने व पण्याच्या पाण्याच्या उपायोजनासाठी आपल्याला काही सहकार्याची गरज भासत असल्यास आम्ही आपणास ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेमार्फत पूर्णपणे सहकार्य करु, असेही गणेश थोरवे म्हणाले. याबाबत लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्‍वासन वन विभाग अधिकार्‍यांनी यावेळी दिले.

Exit mobile version