। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर आणि कनौजमधील शिखर पानमसाला व्यापारी पीयूष जैन यांच्या घरी प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात अफाट मोठ्ठे घबाड सापडले. आयकर विभागाच्या मदतीने डीजीआयच्या टीमने या व्यापार्याच्या घगरावर काल छापा टाकला. शंभर, दीडशे नव्हे तर तब्बल पावणे दोनशे कोटी कोटी रुपयांचा साठा सापडला. व्यापार्याच्या घरातील कपाटांमध्ये रद्दी, कचरा भरावा त्याप्रमाणे खचाखच नोटा भरलेल्या आढळून आल्या. या नोटांची गणती अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी या व्यापार्याच्या घराची झडती घेण्यात आली. पियूष जैन यांचे पुत्र प्रत्यूष आणि प्रियांश जैन यांना अटक करण्यात आली असून अधिकारी पुढील तपास करत आहे.