तीन सुवर्ण, एका रौप्यपदाकची कमाई
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
संभाजी नगर येथील गारखेडा येथे विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघातून रायगडच्या खेळाडूंनी ज्युनिअर, सिनियर आणि मास्टर स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई केली आहे.
यामध्ये कुणाल पिंगळे (ज्युनिअर, सुवर्णपदक), दिनेश पवार (मास्टर, सुवर्णपदक), अक्षय शंनमुगम (सिनिअर, सुवर्णपदक), संतोष गावडे (मास्टर, रौप्यपदक) यांनी पदके पटकावली आहेत. या खेळाडूंच्या यशाबद्दल रायगड पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश वेदक, सेक्रेटरी अरुण पाटकर तसेच या खेळातील मान्यवर सचिन भालेराव, राहुल गजरमल, माधव पंडीत, यशवंत मोकल, संदीप पाटकर यांनी अभिनंदन केले.