आज नागावमध्ये रंगणार रायगड श्री २०२२ शरीरसौष्ठव स्पर्धा

। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्रात प्रथमच एकत्रित बॉडी बिल्डिंग व मेन फिजिक जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंदार वर्तक मित्र मंडळ, नागाव – आक्षीतर्फे रायगड श्री २०२२ जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा शनिवारी (दि.२६) संध्याकाळी ६ वाजता नागाव हायस्कुल येथे होणार आहे. तसेच, या स्पर्धेला वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉन्झ मेडल विजेते, दोन वेळा मास्टर कॅटेगरीमध्ये मिस्टर इंडिया, दोन वेळा महाराष्ट्र टायटल विनर सहा.पो.नि. सुभाष पुजारी, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग फेडरेशन जनरल सेक्रेटरी चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग फेडरेशन लिगल अ‍ॅडवायझर अ‍ॅड. विक्रम रोठे, कोकण बॉडी बिल्डिंग फिटनेस स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड. किरण कोसमकर, वर्ल्ड शॉर्टेस्ट कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डर, गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर प्रतीक मोहिते, अ‍ॅथेलेट, मिस.एशिया आदिती बंब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Exit mobile version