| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात रायगड जिल्हा टॅलेंट सर्च परीक्षा शनिवारी 3 ऑगस्ट रोजी पाली बिटातील 74 व जांभुळपाडा बिटातील 73 इयत्ता चौथीचे विद्यार्थी परीक्षेसाठी दोन्ही केंद्रांवर उपस्थित होते. ही परीक्षा अतिशय आनंददायी उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची मनातील भीती निघून जावी व भविष्यातल्या कठीण स्पर्धेत आपला विद्यार्थी टिकावा या हेतूने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.रायगड जिल्ह्यात आदर्श शिक्षक रत्नाकर पाटील यांनी रायगड जिल्हा टॅलेंट सर्च नावाने शिक्षण रुपी चळवळ निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील मुलांना नवोदय विद्यालय, व शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षणाची संधी जास्तीत जास्त मिळावी या हेतूने सुधागड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे यांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.
पाली हअटाचे केंद्र संचालक राजेंद्र अंबिके, के. खानेकर, पर्यवेक्षक गोरख आघाव, गदमले, राम संकाये, ढाकणे, तर जांभूळपाडा बिटाचे केंद्र संचालक आनंदा पाटील, ठोकल, पर्यवेक्षक जयेश साजेकर, श्रीकांत फुंदे, प्रवीण धारकुंडे, लक्ष्मण पवार यांनी या रायगड जिल्हा टॅलेंट सर्च संपूर्ण परीक्षेचे उत्कृष्ट नियोजन केले. सुधागड तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून नवघर शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे व जनार्दन भिलारे यांनी या सर्व शिक्षकांच्या मदतीने परीक्षेचे नियोजन करून निकाल ताबडतोब तयार करून जिल्ह्याकडे सुपूर्द केला आहे.
पाली बिटातील पहिले तीन क्रमांक : आरोही नथुराम भोय (176), सर्वेश शत्रूघ्न भोईर (174), श्रेया संतोष जाधव (120). तर, जांभुळपाडा बिटातील पहिले तीन क्रमांक ः श्रेया शंकर जेधे (188), अक्ष नरेश करंजकर (186), शिवम सुशील वाडेकर (162).