वादळी वार्‍यासह मुरूडला पाऊस

Exif_JPEG_420

| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड शहर व परिसरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वार्‍यासह बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला तीनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. दुपारनंतर वातावरणात थोडासा बदल झाला होता. वादळी पावसाने पीकांचे आर्थिक नुकसान होऊन पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला जाणार आहे.

Exit mobile version