उत्तर महाराष्ट्राला पावसाचा तडाखा

600 जनावरे गेली वाहून
। जळगाव । प्रतिनिधी ।
हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र भागात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. सोमवारी रात्री चाळीसगाव तालुका परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज असून चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एसडीआरएफ पथकाची मागणी केली.या महापुरात 600 जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्याचबरोबर मन्याड प्रकल्प पूर्ण भरल्याने गिरणा नदीपात्र तसेच जामदा बंधार्‍यातून किमान 1500 क्यूसेक प्रवाह आहे. त्यामुळे तितूर, डोंगरी व गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून ही वाहतूक नांदगाव शिवूर बंगला मार्गाने वळविण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Exit mobile version