| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील वायरमन रमाकांत रामचंद्र आमले (82) यांचे शुक्रवार, दि. 16 मे रोजी पहाटे 4.15 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. काही महिन्यांपूर्वी आमले यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.
प्रख्यात वायरमन अशी ओळख असणाऱ्या आमले यांनी 2003 सालात श्रीवर्धन येथे महावितरण कार्यालयाच्या वायरमनचा संप असताना मोठी कामगिरी बजावली होती. सायंकाळी विजेच्या खांबावरील विद्युत वाहिन्यात बिघाड झाल्याने श्रीवर्धन येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. वायरमनचा संप असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता नव्हती. त्यावेळी श्रीवर्धन पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक यांनी आमले यांना विद्युतपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली होती. आमले यांनी विजेच्या खांबावर जात खंडित वीजपुरवठा सुरळीत केला होता. या कामगिरीबद्दल श्रीवर्धन तहसीलदार यांनी आमले यांचा सत्कार केला होता.