। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील बाहे गावातील कृषीनिष्ठ शेतकरी रामचंद्र कानू गोविलकर यांचे शुक्र.3 डिसें.रोजी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. यांचे शेती व्यवसायावर प्रेम होते, भाजीपाला पिकामध्ये सतत नाविण्यपूर्ण प्रयोग करून भाजीपाल्याचे जास्तीचे उत्पादन घेण्याचा त्यांचा कयास असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे अंतिम धार्मिकविधी शनिवार दि.12 डिसें.तर अंतिम धार्मिकविधी मंगळ.दि.15 डिसें.रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.