। अलिबाग । प्रतिनिधी ।
पनवेलमधील तळोजे मजकूर येथील सर्वे नं. 109/2/6 या मिळकतीमध्ये झालेल्या मोजणीत सावळा गोंधळ झाल्याचा आरोप रामचंद्र कदम यांनी केला आहे. मोजणी न करताना चतुसिमेच्या लगत खातेदार असताना नोटीस न देता मोजणी चुकी करून नकाशा तयार केला आहे. भूमीअभिलेख कार्यालयातील भुकरमापक तेजस पाटील यांनी हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी भूमीअभिलेख कार्यालयात तक्रार केली आहे.
तक्रारदार रामचंद्र केशवराव कदम हे पनवेल तालुक्यातील कोयना वेळे येथील रहिवासी आहेत. तळोजे मजकूर येथे 21 व सुमारे साडे 37 गुंठे जमी त्यांच्या मालकीची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ही जमीन आहे. सर्वे नं. 109/12 ची मोजणी भूमीअभिलेख कार्यालयातील लिपीक तेजस पाटील यांनी केली. मोजणी करताना कदम यांना नोटीस दिली नाही. ही मोजणी बेकायदेशीर असल्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून ते भूमी अभिलेख कार्यालयात चपला झिजवत आहे. अलिबागमधील भूमिअभिलेख कार्यालयात देखील त्यांनी या मोजणीविरोधात तक्रार केली. त्याठिकाणीदेखील त्यांना न्याय मिळाला नाही. रामचंद्र कदम यांच्या तक्रारीनंतर अखेर भूमीअभिलेख विभागाने 109/3, 109/11 ची टेपने मोजणी केली. मात्र 109/12 ची मोजणी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. 109/12 या सर्वे नंबरमधील जमीनीचा सातबारा बनवून या सर्वेमधील जमीन नकाशात वाटप नसताना अनधिकृतपणे वाटप करून दिली आहे. तेजस पाटील यांनी आर्थिक हितसंबंध जपत ही मोजणी केल्याचा आरोप तेजस पाटील यांच्यावर केला आहे.
कोयना प्रकल्पासाठी प्लॉट वाटप करण्यात आले आहेत. सातबारा गुंतागुंती, तफावत असल्याने गोंधळ झाला आहे. मोजणी करणार्यांच्या लक्षात येत नाही. मोजणी करताना कोणताही गैरप्रकार केला नाही.वहिवाट व क्षेत्र कायम आहे. त्या पध्दतीने मोजणी केली होती. मोजणीवर आक्षेप असल्यास त्यांनी ती रद्द करावी.
तेजस पाटील,
भूकरमापक