रमेश कांबळे सेवानिवृत्त

। उरण । वार्ताहर ।

उरण नगरपरीषदेमध्ये गेले 15 वर्ष आपल्या म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे उरण युनिटचे रमेश कांबळे यांनी अध्यक्षपद सेवा पूर्ण करुन निवृत्त झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ शुक्रवार (दि.31) मे रोजी पार पाडला.

या कार्यक्रमाचे प्रस्तावीक म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले. ते म्हणाले कामाला लागलेला प्रत्येक व्यक्ती वयोमानानुसार निवृत्त होणारच. परंतु, आपण कसे जगायचे हे आपण ठरवायचे असते. त्याप्रमाणे रमेश कांबळे यांनी कधीही सेवा देत आसताना स्वत:चा स्वार्थ पाहीला नाही. पुढे अनिल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासनाला खडे बोल सुनावले. नगरपरिषदेमध्ये अतीशय प्रामाणिकपणे सफाईचे काम करून 15 वर्ष संघटनेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना रमेश कांबळे यांनी आपल्या परीने प्रशासन आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून काम करताना कोणालाही कधीही दुखावले देखील नाही. यावेळी म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, अनिल जाधव, घनःश्याम कडू, ई.आर. माने, निखील ढोरे, संजय धापसे, निकम, श्याम मोरे, नरेंद्र उभारे, हरेश जाधव, महेंद्र साळवी, धनेश कासारे, राजेश सोलंकी, जितेंद्र पाडावे उपस्थित होते.

Exit mobile version