। माणगाव । सलीम शेख ।
ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्ली येथे 5 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा होणार आहे.
या मोर्चात ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम ठेवणे, नॉन क्रिमिलरची अट रद्द करणे, 50 टक्के सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे,धान्यमालाला हमीभावाने खरेदीची हमी देने, महागाई थांबविण्यासाठी ठोस पावले उचलने, संपूर्ण शिक्षण मोफत, मोफत आरोग्य सुविधा पुरविणे या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
या आंदोलनात रायगड, रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून मोठ्या संख्येने रासपच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष तथा राज्यकार्यकरिणीचे सदस्य भगवान ढेबे यांनी केले आहे.