जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन

| अलिबाग । वार्ताहर ।

सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबाग आणि जिल्हा शासकीय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिना साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. साक्षी पाटील यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संतोष बोंद्रे यांनी वाचनाचे महत्व विषद करून डॉ. कलाम यांच्या असामान्य व्यक्तीमत्वाचे महत्व सांगितले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनालयाच्यावतीने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अलिबागचे संचालक नागेश कुळकर्णी अजित पवार, भालचंद्र वर्तक, आर. के. घरत, श्रीरंग घरत, शरद कोरडे, मुस्ताक घट्टे, जेष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, जगदीश नागे, नंदू तळकर तसेच वाचनालयाचे कार्मचारी वर्ग आणि वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक संतोष बोंद्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नागेश कुळकर्णी यांनी केले.

Exit mobile version