| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ संचालित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय श्रीवर्धन ग्रंथालयात बुधवारी दि.15 वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवसानिमित्त, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘विंग्स ऑफ फायरच्या ऑडिओबुक ऐकवण्याचे सत्र आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, तसेच कष्ट, प्रामाणिकपणा आणि स्वप्नपूर्ती याचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली ‘डिझाईन अ बुकमार्क’ ही स्पर्धा कार्यक्रमाच्या पूर्वसप्ताहात पार पडली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी आर्या ठाणगे व सर्वस्वी म्हाप्रोळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सर्जनशीलतेचा गौरव सर्वांसमक्ष करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दत्तात्रेय राणे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.






