। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायती निवडणुकीकरिता सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवार, दि.22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वा. नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथील सभागृहात केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी, अलिबाग मुकेश चव्हाण यांनी दिली आहे.