अहमद काझी यांची सेवानिवृत्ती

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मरीन खात्यातील फर्स्ट क्लास मास्टर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष अहमद काझी हे गुरूवारी (दि.31) 36 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने त्यांचा मरीन खात्यातील शोअर व फ्लोटीला कामगारांच्यावतीने बुधवार (दि.30) इंदिरा गोदीत जाहीर सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अ‍ॅड. जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. शेट्ये यांच्या हस्ते अहमद काझी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला अहमद काझी यांचे कुटुंब, नातेवाईक, इतर संघटनांचे कार्यकर्ते व गोदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version