वापरात नसलेल्या जमिनी परत करा

साळावच्या जेएसडब्ल्यू विरोधात शेकाप आक्रमक
व्यवस्थापनाला निवेदन
मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन

| मुरुड | वार्ताहर |
साळाव येथील कंपनीसाठी जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांच्या वापरात नसलेल्या जमिनी तातडीने परत करा याशिवाय अन्य प्रलंबित मागण्यांची पुर्तता विद्यमान जेएसडब्ल्यू कंपनीने करावी,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मुरुड तालुका शेकापने दिला आहे.

1989 -90 रोजी साळाव,निडी,मिठेखार व चेहर परिसरातील जमीनी राज्य शासनाने तर्फे खरेदी करण्यात येऊन त्या जमिनी औद्योगिक वापरासाठी खरेदी करण्यात आल्या. खरेदी केलेली जमीन विक्रम इस्पात बिर्ला कंपनीस उद्योग करण्यासाठी देण्यात आली. त्याप्रमाणर या कंपनीने कारखाना व कॉलनी उभारली परंतु तरीसुद्धा अंदाजे 150 एकर जमीन ही 32 वर्ष वापरातच आलेली नाही.शासनाच्या नियमाप्रमाणे जर ही जमीन वापरात नसेल तर मुळ मालकाला दिली जाते.शेतर्‍यांच्या या जमिनी त्वरित परत द्या हि मुख्य मागणीसह असंख्य मागण्या जे.एस.डब्ल्यू .साळाव कंपनीने पूर्ण कराव्यात यासाठी कंपनी व्यवस्थापनास रीतसर निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन या कंपनीचे व्यवस्थापक भानूप्रसाद यांनी स्वीकरले. सदरचे निवेदन मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मनोज भगत यांच्यसह मधुकर पाटील,सी.एम.ठाकूर, सरपंच मनीष नांदगावकर, वळके उपसरपंच विजय म्हात्रे, शरद चवरकर, माजी सभापती बाबू नागावकर, अजित कासार, रिजवान फहीम, आदिनाथ सानेकर, रवींद्र माळी, किशोर पाटील, अशोक चवरकर, चोरढे माजी सरपंच गणेश टावरी,दिलीप चवरकर, मतीन सौदागर आदींसह असंख्य शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कंपनीत प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरी मिळाली नाही.अशांना कंपनीने प्रथम प्राधान्य देत तातडीने त्यांना नोकरीत सामावून घ्यावे.कंपनीने जमीनी खरेदी करतेवेळी शेतकर्‍यांशी करार केला होता त्याप्रमाणे नोकरी दिलेली नसेल अश्या मुलांना मानधन त्वरित जुन्या थकबाकीसह देण्यात यावे. या कंपनीत भरती प्रक्रियेत शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी याना विश्‍वासात घेण्यात यावे परंतु कंपनी परस्पर भरती करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.कंपनीतर्फे निघणारी कामे हि ठेकेदारीवर दिली जातात.त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला वगळले जाते यापुढे कंपनीने सी.एस.आर विभागातील सर्व कामे शेतकरी कामगार पक्षातील कार्यकत्यांनाच व स्थानिकांना देण्यात यावी.

नागरिकांच्या सोयीसाठी असणारे पोष्ट ऑफिस कंपनी जागेत सुरु करावे त्यामुळे स्थानिक नागरिकांना पोस्टाची सुविधा मिळणार आहे.प्रकल्पग्रस्त मुलांना क्रीडांगण तसेच हॉस्पिटल मध्ये ऍम्ब्युलन्स इतर सुविधा मिळाव्यात व सिक्युरिटी मध्ये विश्‍वासात घेऊन नोकर भरती करण्यात यावी अश्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.जर कंपनी व्यवस्थापनाने मागण्यांचा विचार न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रमुख कार्यकर्ते मधुकर पाटील यांनी सांगितले की, कंपनीने वापरात नसलेली 150 एकर जमीन मूळ शेतकर्‍यांना परत करावी कारण या जमिनी बळजबरीने घेण्यात आलेल्या आहेत.जर जमीन परत करीत नसाल तर स्थानिक शेतकर्‍यांना कंपनीने योग्य मोबदला तरी द्यावा अशी मागणी केली आहे. जे.एस.डब्ल्यू .साळाव कंपनी चे व्यवस्थापक भानूप्रसाद यांनी सांगितले की,, सदरचे निवेदन सिनियर मॅनेजमेंट यांच्याकडे देणार असून या लोकांशी लवकरात लवकर चर्चा घडवून आणण्यात येईल.

या कंपनीने 1989 सालापासून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत.मागण्या मंजूर न केल्यास जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडले जाईल.

– मनोज भगत, तालुका चिटणीस


Exit mobile version