रेवदंडा-चौल प्रिमियर लीग चषक: रेवदंडा अथर्व स्पोर्ट्स विजेता

| कोर्लई | वार्ताहर |
रेवदंडा-चौल पंच कमिटी आयोजित रेवदंडा-चौल प्रिमियर लीग चषक-2023 चा मानकरी येथील अथर्व स्पोर्ट्स क्रिकेट संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरल्याने तमाम क्रिकेट प्रेमींनी विजयाचा जल्लोष केला. रेवदंडा येथे चौल-रेवदंडा प्रिमियर लीग चषक-2023 या दोन दिवसीय टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन रेवदंडा हरेश्‍वर मैदान येथे करण्यात आले होते. या सामन्यात रेवदंडा-चौल हद्दीतील 12 संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

तालुका प्रमुख प्रफुल्ल मोरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. रेवदंडा अथर्व स्पोर्ट्स क्रिकेट संघ व थेरोंडा येथील ओमसाई क्रिकेट संघ यांच्यात चुरशीच्या झालेल्या सामन्यात सामन्यात रेवदंडा अथर्व स्पोर्ट्स क्रिकेट संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे रोख रुपये 70 हजार व चषक बक्षिस पटकाविले. थेरोंडा येथील ओमसाई क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये 35 हजार. व चषक तर आग्राव येथील अवनी इलेव्हन क्रिकेट संघाने रोख रुपये 25 हजार व चषक मिळविला. यावेळी थेरोंडा येथील ओमसाई क्रिकेट संघाच्या अजय चौलकर याला मालिकावीर, भोवाळे येथील दत्तकृपा क्रिकेट संघाच्या धनंजय गोळे याला उत्कृष्ट फलंदाज, रेवदंडा अथर्व स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या वरद धाटावकर याला उत्कृष्ट गोलंदाज तर यश जंगली याला सामनावीर देण्यात आले.

यावेळी सुरेंद्र म्हात्रे, संदीप खोत, जनार्दन कोंडे, निलेश खोत, अ‍ॅड. रोहित भोईर, अजित गुरव, अतुल वर्तक, संतोष ढक्षिकर, पुरुषोत्तम भगत, शैलेश मारकु, विश्‍वास टिवळेकर, दिपेश पाटील,सागर विचारे,तेजस शिंदे,कल्पेश शेळके,संकेत जोयशी,जयेश कोंडे,मोनिश जाधव,रिझवान पटवी मान्यवर उपस्थित होते. तेजस शिंदे, सौरभ भुरे, प्रदीप भोईर, प्रितेश म्हात्रे यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन तर बाळकृष्ण दर्णे गुरुजी यांनी गुणलेखन केले.मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेवदंडा-चौल पंच कमिटीतील पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version